गुगल मॅपने ट्रक घुसविला गल्लीबोळात!

धडकेत विजेचा खांब तुटला

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
साकोली,
Google Maps drove a truck into street माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माणसांकरवी पत्ता विचारुन इच्छीत स्थळी पोहचणे म्हणजे कमीपणाचे, असाच काहीसा समज आहे. मगं ‘गुगल मॅपङ्क सगळयांना रस्ता दाखवितो. प्रत्येकाचा त्याच्यावर स्वतःपेक्षा अधिक विश्वासही आहे. मात्र याच गुगल मॅपने एका ट्रक चालकाला अशा गल्लीबोळात नेले की, तेथून बाहेर पडणे कठीण झाले. महावितरणाचा विजेचा खांब तोडून बाहेर पडलेल्या ट्रकचालकाला नाहक ५० हजाराचा भुर्दंड बसला. यात सिंहाचा वाटा आहे तो गुगल मॅपचा! माहिती तंत्रज्ञानाने प्रगती केली, मात्र माणसांपेक्षा कूणीही हूशार असू शकत नाही, हे कदाचित ‘त्याङ्क ट्रक चालकाला तरी आता उमजले असावे. जालना येथून कलकत्याच्या दिशेने डब्ल्यू बी.३३ एफ १५८९ क्रमांकाचा मालहून ट्रक निघाला.
 
 

Google Maps 
 
 
हा ट्रक साकोली उड्डाण पूलाच्या खालून जात होता. दरम्यान चालकाला साकोलीत एका इच्छीत स्थळी जायचे असल्याने त्याने साकोलीकरांना विचारपूस करुन त्रास न देता, थेट गुगल मॅपची मदत घेतली. गुगलने मार्ग दाखविणे सुरु केले. महामार्गावन ट्रक कटकवार बाजार ओळीतून दूर्गा मंदिर चौकातील प्रभागात आला. तेथे अरूंद रस्ता असतानाही वळण घेण्याच्या नादात टड्ढक फसला आणि महावितरणच्या खांबाला आदळला. उच्च दाबाच्या तारा या खांबावर होत्या. यावेळी जीवंत तारांसह खांब तुटून एका घरावर पडला व विद्युत पुरवठा खंडित झाला. सुदैवाने कोणतीही दूर्घटना घडली नाही. यावेळी नगरसेवक किशोर पोगळे घटनास्थळी दाखल झाले. महावितरणाचे कर्मचारी तेथे आले. अखेर महावितरणाचे झालेल्या ५० हजाराच्या नुकसानीचा भुर्दंड ट्रक चालकावर बसला. मात्र हा विषय शहरात चांगलाच चर्चेचा ठरला. गुगल च्या नादात गल्लीबोळात शिरल्याने ५० हजाराचा पडलेला फटका मात्र गुगल शिवाय पान न हलणाèयांसाठी चांगलाच लक्षात राहणारा आहे.