हाेमगार्ड प्रशिक्षणार्थींना भर रस्त्यावर बेदम मारहाण

सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
home guard trainees हाेमगार्ड प्रशिक्षणार्थींना भर रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली. सदर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. श्रेयस सुभाष मानकर (24, सुरेंद्रगढ, सेमिनरी हिल्स) व संदीप मदनलाल रहांगडाले (23) असे मारहाण झालेल्या प्रशिक्षणार्थींची नावे आहेत. या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.
 
 
 
हाेमगार्ड प्रशिक्षणार्थींना भर रस्त्यावर बेदम मारहाण
 
दाेघेही धंताेली येथील हाेमगार्ड प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. 3 एप्रिल राेजी रात्री दहा वाजताच्या सुमारास ते भूक लागल्याने अधिकाèयांची परवानगी घेऊन सदरमधील मंगळवारी बाजार भागात गेले हाेते. जेवणाचे पार्सल घेऊन धंताेलीकडे परत निघाले असताना रेल्वे विभागाच्या स्विमिंग पुलाजवळ माेटारसायकलस्वाराने कट मारला. त्यावर श्रेयसने त्याला नीट गाडी चालविण्यास म्हटले. समाेरील तरुणाने दाेघांसाेबतही वाद घातला व ाेन करून त्याच्या मित्रांना बाेलविले. श्रेयसनेदेखील त्याच्या एका मित्राला ाेन केला. आराेपींनी रेल्वे काॅलनीतील संताेषी मंदिराजवळ श्रेयस व संदीपला अडविले आणि शिवीगाळ करत ायबर पाईपने बेदम मारहाण केली. त्यानंतर आराेपी निघून गेले.home guard trainees ते जात असताना श्रेयसचे दाेन मित्र तेथे पाेहाेचले. त्यातील एक जण आराेपींना ओळखत हाेता. हल्ला करणाèयांमध्ये प्रवीण उईके (25), स्वप्नील (23), आशू उईके (25) व इतर चार जण असल्याचे त्याने सांगितले. सर्व जण सदरमधील गाेंडपुरा येथील निवासी हाेते. त्या मित्रांनी दाेघांनाही सदर पाेलिस ठाण्यात नेले. पाेलिस त्यांना उपचारासाठी मेयाे इस्पितळात घेऊन गेले. उपचार झाल्यानंतर श्रेयसच्या तक्रारीवरून आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.