न.प. उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रं २ ला आदर्श शाळा पुरस्कार

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
मंगरूळनाथ, 
Ideal School Award शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्य, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी तळमळ, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा, तंत्रस्नेही शिक्षक आणि विद्यार्थी हितासाठी झटणारे शिक्षक असलेल्या, अमरावती विभागातील नामांकित शाळेचा गौरव करण्यात आला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र राज्य आदर्श शाळा पुरस्कार मंगरुळनाथ येथील नगर परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रं २ या शाळेला प्रदान करण्यात आला आहे. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे पुणे येथील ग. दि. मांडगुळर नाट्यगृहात आयोजित एज्युकेशन आयकॉन समिट २०२६ या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपमहापौर शर्मिला बाबर, छत्रपती संभाजी नगरचे उपजिल्हाधिकारी शुभम पवार, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षण मंडळाचे सभापती नानासाहेब शिवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
Ideal School Award
 
 
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे यांच्या हस्ते शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सतीश गायकवाड, मुख्याध्यापक किशोर खोडके, शिक्षक संतोष राठोड, रामराव साखरे, श्रीकांत इंगोले, सचीन धर्माळे, विलास बिरकड, नितीन मोरे, रामदास पांढरे, वैजनाथ दहीफळे, किशोर जोशी, रामेश्वर डुकरे यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक किशोर खोडके यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या अहोरात्र, समर्पित सेवेमुळे शाळेला यशोशिखरावर पोहोचण्यासाठी मदत झाली असे मान्य केले.