श्रीनगर,
Interstate network destroyed in Srinagar जम्मू आणि काश्मीर पोलिसांनीमोठी कारवाई करत शहरात कार्यरत असलेल्या दहशतवादी जाळ्याचा भांडाफोड केला आहे. या मोहिमेत लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित आंतरराज्यीय गट उघडकीस आला असून दोन पाकिस्तानी नागरिकांसह एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही कारवाई व्यापक दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग असून केवळ जम्मू-काश्मीरपुरती मर्यादित नसून इतर राज्यांपर्यंतही तिचा विस्तार करण्यात आला आहे. केंद्रातील विविध सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने पंजाबसह इतर भागांतही तपास आणि शोधमोहीम सुरू आहे.
ही कारवाई अत्यंत गोपनीय माहितीनुसार राबवण्यात आली. तांत्रिक माध्यमांतून मिळालेल्या संकेतांमुळे या जाळ्याचे धागेदोरे जम्मू-काश्मीरच्या बाहेरपर्यंत पसरले असल्याचे समोर आले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील संपर्क आणि त्यांच्या मदतीबाबतही सखोल चौकशी केली जात आहे. सध्या तपास प्रक्रिया सुरू असून पुढील काही दिवसांत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे दहशतवादी कारवायांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.