जनआक्रोशद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
देहरादूनच्या ६५ प्रमुख चौकांमध्ये हा उपक्रम
 
नागपूर, 
'Janaakrosh' road safety awareness campaign नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी ‘जनआक्रोश — फॉर बेटर टुमॉरो’ च्या देहरादून शाखेतर्फे ९ एप्रिल रोजी उत्तराखंडच्या देहरादून ६५ प्रमुख चौकांवर भव्य ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान’ आयोजित करण्यात आल्याची माहिती जनआक्रोश नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश खांडेकर, कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश पाहुणे यांनी दिली आहे.
 
 
janakrosh ddslk

शालेय विद्यार्थी सहभागी होणार
Janaakrosh' road safety awareness campaign  सोशल बलुनी पब्लिक स्कूल, दून विद्यापीठ तसेच वीर दुर्गा मेमोरियल ट्रस्ट यांचे सहकार्याने हे अभियान राबवले जात असून अभियानात सुमारे शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत शहरातील विविध चौकांवर एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना वाहतूक नियम, सुरक्षित वाहनचालकता आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
वाहतूक वर्तनाची जाणीव
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक) प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) तसेच महानगरपालिका प्रशासन यांना आवश्यक सहकार्य लाभत आहे. जनआक्रोश, उत्तराखंडचे संयोजक विनोद असवाल यांनी या उपक्रमातून नागरिकांमध्ये जबाबदार वाहतूक वर्तनाची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.