महाराष्ट्राच्या खेळाडूंचा जलवा कायम!

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
- ७वी १७ वर्षाखालील कनिष्ठ बॉक्सिंग स्पर्धा

नागपूर, 
Junior boxing tournament नागपूरच्या आमदार निवासमध्ये सुरू असलेल्या ७वी १७ वर्षाखालील कनिष्ठ मुला-मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेत तिसर्‍या दिवशी रिंगमध्ये अक्षरशः ‘पंच’चा पाऊस पडला! आक्रमक रणनीती, जलद फुटवर्क आणि अचूक काउंटर अटॅकने प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी ‘हाय-व्होल्टेज’ ठरला. टाळ्यांच्या संपूर्ण वातावरण क्रीडाज्वराने भारून गेले.
 
 
Junior boxing tournament
 
Junior boxing tournament  तिसर्‍या दिवशी अनेक बॉक्सर्सनी दमदार विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला स्पर्धा आता निर्णायक टप्प्याकडे सरकत आहे. पुढील दिवसांमध्ये क्वार्टर फायनलमध्ये अधिक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या पीआर कमिशनचे चेअरमन नईम कुरेशी यांच्या माहितीनुसार, विनोद कुमार (ज्युनियर बॉईज मुख्य प्रशिक्षक, बीएफआय) डी. एस. थापा (लेफ्टनंट कर्नल, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे) यांची नजर प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर खिळलेली आहे. महाराष्ट्राकडून इशिका (४६ किलो), समृद्धी (६० किलो) आणि शानाया (६३ किलो) यांनी शानदार विजय मिळवत पुढील फेरीसाठी पात्रता कायम ठेवली. याच स्पर्धेतून भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
लढतींचा थरारक (मुख्य निकाल)
लाईट वेट (६० किलो)
दीक्षा (हरियाणा) ने (प. बंगाल) वर विजय,
गझल (राजस्थान) ने जेमी (तामिळनाडू) ला ५:०,
केनिता देवी (मणिपूर) ने पलक (झारखंड) ला हरवले,
जागृती (उत्तर प्रदेश) ने चिन्मयी (कर्नाटक) वर विजय,
सुहाना (हिमाचल) ने अंजेल (दिल्ली)ला हरवले,
इसीका (चंदीगड) ने अमनदीप (पंजाब) ला ४:१,
(महाराष्ट्र) ने हर्षिता (उत्तराखंड) ला पराभूत,
देवानंदा ने संस्कृती (बिहार) ला ५:०,
लाईट वेल्टर (६३ किलो)
शानाया (महाराष्ट्र) ने प्रीती देवी (मणिपूर) पराभूत,
कनिष्का (झारखंड) ने अक्षरा (केरळ) ला ५:०,
संगीता (आसाम) ने महक (हिमाचल) वर विजय.
५२ किलो गटात तेलंगणाच्या कृती अगरवालला आणि ७० किलो गटात उत्तर प्रदेशच्या प्रतिस्पर्धी खेळाडू अनुपस्थित राहिल्यामुळे ‘वॉकओव्हर’ घोषित करण्यात आले.
नागपूरमध्ये बॉक्सिंगचा जल्लोष शिगेला!
दररोज रंगत जाणार्‍या या स्पर्धेमुळे नागपूर शहरात क्रीडाप्रेमींचा उत्साह उच्चांक गाठत आहे. प्रत्येक सामन्यासोबत नव्या टॅलेंटची झलक दिसत असून तिसरा दिवस अधिक वेग, अधिक ताकद आणि रिंगमध्ये जिंकण्यासाठी झुंजार लढत दिसून येत होती.