नागपूर,
Kalijphool wins first award काळीजफूल' या लेखिका वर्षा किडे कुळकर्णी ललित लेखसंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद वारणानगर शाखेचा संकीर्ण विभागातील राज्यस्तरीय साहित्य प्रथम पुरस्कार आमदार डॉ.विनयरावजी कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र साहित्य परिषद वारणानगर शाखा आणि वारणा विभाग सत्कार्य संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त प्राचार्य डॉ सुनील कुमार लवटे, माजी परीक्षा विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉक्टर बी एम हिर्डेकर, विश्वस्त वारणा सत्कार्य संवर्धन मंडळाचे के एम वाले, मसाप वारणानगर शाखेचे कार्यवाह के जी जाधव, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रताप पाटील, तसेच व्यवस्थापकीय अध्यक्ष विश्वेश कोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हा सोहळा संसद भवनाची प्रतिकृती असलेल्या भव्य शेतकरी भवनात संपन्न झाला. Kalijphool wins first award शाल, सुंदर फ्रेम केलेलं सन्मान पत्र,₹ ३००० चा धनादेश, ग्रंथभेट असं पुरस्कार स्वरूप होतं. 'काळीजफूल' ला मिळालेला हा चवथा पुरस्कार आहे. या आधी शिवाबाबा प्रतिष्ठान नाशिक (प्रथम), महाराष्ट्र साहित्य परिषद, सोलापूर (प्रथम ) आणि सार्वजनिक वाचनालय कल्याणचा मुंबई (प्रथम) हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र