रात्री ८ पासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन!

बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत बंद

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Lockdown in Pakistan ऊर्जा बचतीसाठी पाकिस्तानी सरकारने देशभरात काही ठिकाणांची व्यापार आणि शॉपिंग मॉल्सची वेळ मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामाबादमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. सिंध प्रांताव्यतिरिक्त सर्व प्रदेशांत बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील विभागीय मुख्यालयांमध्ये बाजार रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असल्याचे सांगितले होते. बैठकीत खैबर पख्तुनख्वा, पंजाब, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगिट-बाल्टिस्तान आणि इतर भागांमध्ये लागू होणाऱ्या वेळा निश्चित करण्यात आल्या.
 
 
down
 
मेडिकल स्टोअर्स आणि फार्मसींना सुट
बेकरी, रेस्टॉरंट्स, तंदूर आणि खाद्यपदार्थ विकणारी दुकाने रात्री १० वाजेपर्यंत चालू राहू शकतील. तसेच विवाह मंडप, लग्नसमारंभांसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक जागा देखील रात्री १० वाजेपर्यंतच उघडल्या राहतील. खाजगी जागा आणि घरांमध्ये रात्री १० वाजेनंतर विवाह समारंभ आयोजित करण्यास बंदी राहणार आहे. मात्र, मेडिकल स्टोअर्स आणि फार्मसींना या निर्बंधातून सुट दिली गेली आहे. नवीन वेळा ७ एप्रिलपासून लागू करण्यात आल्या आहेत. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा सरकारांनी आपापल्या प्रांतांसाठी व्यवसाय वेळा निश्चित केल्यानंतर ही नियमावली लागू करण्यात आली आहे.