लोही ग्रामपंचायतला ‘आयएसओ’ मानांकन दर्जा

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
बोरी चंद्रशेखर, 
Lohi Gram Panchayat gets ISO certification दारव्हा तालुक्यातील लोही ग्रामपंचायतला तालुक्यातून पहिली आयएसओ मानांकन ग्रामपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला. दारव्हा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिंदे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. 2025-26 मध्ये ग्रामपंचायत अधिकारी विद्याधर चौधरी यांच्या संकल्पनेतून व सरपंच संजय शिंदे, उपसरपंच राजू हळदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या पुढाकारातून शासनाने ठरवून दिलेल्या विषयावर नियोजनबद्धरित्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले.
 
 
lohi
 
Lohi Gram Panchayat gets ISO certification  यामध्ये सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, दप्तर अद्यावतीकरण, नागरिकांना सेवा सुविधा, पायाभूत सुविधा निर्माण करणे, शुद्ध पाणी, सुसज्ज शाळा, अंगणवाडी, सीसीटीव्ही, परिसर जलसंधारण, आरोग्य शिबिरे, घनकचरा व्यवस्थापन, खत निर्मिती प्रकल्प, महिला स्वयंरोजगार, गाव सौंदर्यीकरण, नाविन्यपूर्ण उपक्रम यासारख्या अनेक बाबींवर उत्तम कार्य केल्यामुळे या सुविधांची पडताळणी करून ग्रामपंचायतला आयएसओ दर्जा प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.