अजनी रेल्वे स्थानक येथूनच मडगाव स्पेशल सुटणार

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Madgaon Special Train मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत नागपूर रेल्वे स्थानकावर विकासे कामे केल्या जात आहे. त्यामुळे काही कालावधीकरिता मडगाव स्पेशल अजनी रेल्वेस्थानकावरुन सुटणार आहे. हा बदल पुढील काही दिवस राहणार आहे. विकास कामे सुरू असल्यामुळे काही गाड्यांच्या वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होणार आहे.
 
 
ajani
 
Madgaon Special Train  रेल्वे गाड्यांच्या संचालनामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. यात गाडी क्रमांक ०११४० मडगाव ते नागपूर स्पेशल (गुरुवार, ९ एप्रिल ते २८ मे या कालावधीत नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाऐवजी अजनी येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०११३९ नागपूर ते मडगाव स्पेशल (बुधवार, शनिवार) ८ एप्रिल ते २७ मे या कालावधीत नागपूर ऐवजी अजनी स्थानकावरूनच सुरू करण्यात येईल. प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलांची नोंद घ्यावी तसेच प्रवाशांनी प्रभावित अजनी स्थानकावरूनच चढावे किंवा उतरावे.