बोर्डाकडून गुणपत्रिका, प्रमाणपत्रएकत्रित स्वरूपात मिळणार

फोटो दुरुस्तीही करता येणार

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
पुणे
Maharashtra board Pune दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकत्रित स्वरूपात दिले जाणार आहे. त्याचबरोबर फोटो दुरुस्तीही करता येणार आहे.
 
board 
Maharashtra board Pune राज्य परीक्षा बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाकडून यंदापासून गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच दस्तावेजात मिळणार असल्याने दोन वेगवेगळी कागदपत्रे सांभाळण्याचा ताण कमी होणार आहे. एकंदरीतच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेदम्यान कागदपत्रांची पडताळणीही अधिक सुलभ होणार आहे.
Maharashtra board Pune नवीन दस्तावेजात विद्यार्थ्याचा फोटो आणि क्यूआर कोड देण्यात येणार असून त्यामुळे बनावट कागदपत्रांना आळा बसण्यास मदत होईल. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर फोटो करेक्शन पर्यायामध्ये जाऊन छायाचित्र किंवा नावातील त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
 
Pune