नागपूर,
Pension Court मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत १५ जून सोमवार, सकाळी ११ वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात येणार आहे. ही अदालत नागपूर येथील डीआरएम कार्यालयाच्या अॅनेक्स इमारतीतील गुंजन हॉल येथे होणार आहे.
Pension Court पेन्शन आणि सेटलमेंटशी संबंधित तक्रारींचे निराकरण नागपूर निवृत्त कर्मचार्यांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही पेन्शन अदालत आयोजित करण्यात येत आहे. ज्या निवृत्त रेल्वे कर्मचार्यांना पेन्शन मिळण्यात विलंब होत आहे किंवा इतर पेन्शनसंबंधित अडचणी येत आहेत, त्यांनी आपली निवेदने पूर्वीच सादर करावीत, जेणेकरून आवश्यक कार्यवाही करता येईल. निवेदनामध्ये अर्जदाराचे नाव, पदनाम, वेतनश्रेणी, ग्रेड, नियुक्ती निवृत्ती दिनांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी तसेच संपूर्ण पत्ता स्पष्टपणे नमूद करावा. तसेच, तक्रारीचे स्वरूप स्पष्ट करून संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे.