पवन खेरा यांच्या घरी आसाम पोलिसांची धाड

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Raid on Pawan Khera's house काँग्रेस नेते पावन खरा यांच्याविरोधात सुरू असलेल्या वादात आता नवे वळण आले असून आसाम पोलिसांचे पथक दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. दिल्लीतील निझामुद्दीन पूर्व परिसरातील त्यांच्या घरावर छाननीसाठी पोलिस पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत दिल्ली पोलिसांसह आसाममधील काही अधिकारीही सहभागी होते. मात्र, त्या वेळी खेरा घरात उपस्थित नसून ते अन्य राज्यात गेले असल्याचे समजते.
 
 
 
Raid on Pawan Khera
या प्रकरणाची पार्श्वभूमी म्हणजे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या पत्नी रिनिकी भुयान शर्मा यांनी खेरा यांच्याविरोधात केलेली तक्रार. त्यांनी खेरा यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खेरा यांनी एका पत्रकार परिषदेत रिनिकी भुयान शर्मा यांच्याकडे विविध देशांचे पासपोर्ट असल्याचा आणि परदेशातील आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आरोप केला होता.
 
 
या आरोपांना उत्तर देताना रिनिकी भुयान शर्मा यांनी सर्व दावे फेटाळून लावत हे पूर्णपणे असत्य असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, काही तांत्रिक साधनांचा वापर करून चुकीची माहिती तयार करण्यात आली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री सरमा यांनी खेरा यांच्यावर आणखी गंभीर आरोप करत निवडणुकांवर प्रभाव टाकण्याच्या हेतूने अतिरेकी संघटनांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले आहे. या संदर्भात त्यांच्या विरोधात आधीच अनेक गुन्हे नोंदवले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील काही दिवसांत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. राजकीय वातावरण तापलेले असताना या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.