दक्षिण पूर्व मध्य रेल्वे : पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय कामगिरी
नागपूर,
Railway project completed प्रवासी सुविधा, वहन क्षमता वाढ आणि सुरक्षित रेल्वे संचालन या त्रिसूत्रीवर विशेष लक्ष केंद्रित करून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गेल्या १० वर्षांत १,४७५ किलोमीटर लांबीच्या १५ रेल्वे प्रकल्पांची पूर्तता केली दपूम रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान दपूम रेल्वे प्रशासनाने पायाभूत सुविधांच्या विकासात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
गेल्या दहा वर्षांत १,४७५ किलोमीटर लांबीच्या १५ महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांची यशस्वी पूर्तता केली आहे. ही कामगिरी प्रादेशिक विकास आणि रेल्वे नेटवर्क बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ एकूण किलोमीटर नवीन रेल्वेमार्गाचे लोकार्पण, कमिशनिंग करण्यात आले असून, या अंतर्गत खालील महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत. बिलासपूर-झारसुगुडा चौथी रेल्वे लाईन अंतर्गत कोतरलिया-जामगा (८ किमी), भूपदेवपूर-किरोड़ीमल नगर (८.७० किमी), किरोड़ीमल नगर-रायगड (१०.२७ किमी), रायगड-कोतरलिया (९ किमी), सारागाव-बाराद्वार (७ ’आणि बाराद्वार-सक्ती (१३ किमी) पूर्ण झाले.
१८ आरओबी आणि २७ आरयूबी
Railway project completed आणि सुरक्षित वाहतुकीसाठी १८ रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) आणि २७रोड अंडर ब्रिज (आरयूबी) उभारण्यात आले आहे. याशिवाय, २७२० किलोमीटर लांबीच्या ४१ महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्यात नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण तसेच तिसरी आणि चौथी लाईन प्रकल्पांचा समावेश या प्रकल्पांमुळे वहन क्षमता वाढणार असून, नवीन गाड्या सुरू करणे, गती वाढविणे वेळेचे पालन सुनिश्चित करणे शक्य होणार आहे.
थर्ड लाइनचे काम
राजनांदगाव-नागपूर तिसरी लाइन अंतर्गत गुदमा-गोंदिया (१० किमी), गोंदिया-गंगाझरी (१३.७४ किमी) तसेच आरओआर गोंदिया (१३.५० किमी) तसेच गेवरा रोड-पेंड्रा रोड नवीन लाईन उरगा-कुसमुंडा (११.५१ किमी) केंद्री-धमतरी व अभनपूर-राजिम आमान परिवर्तनांतर्गत अभनपूर-कुरूद (२१.२० किमी) मार्गाचे काम झाले आहे.