आरपीएफ नागपूर विभागाची उल्लेखनीय कामगिरी

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
नागपूर,
RPF Nagpur सुरक्षा बल नागपूर विभाग, मध्य रेल्वे यांच्या सुरक्षा शाखेकडून मार्च २०२६ पर्यंतचा अहवाल जाहीर करण्यात आला असून, गुन्हे प्रतिबंध, प्रवासी सुरक्षा तसेच मानवीय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रेल्वे कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणी अंतर्गत २०२६ च्या पहिल्या तिमाहीत एकूण २,८४३ प्रकरणे नोंदविण्यात आली २,६०७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईतून मार्च २०२६ पर्यंत १६.०५ लाख दंड वसूल करण्यात आला आहे. २०२५ मध्ये १.०५ कोटींपेक्षा अधिक महसूल जमा करण्यात आला होता.
 
 
relway dksl
 
RPF Nagpur  रेल्वे मालमत्ता कायद्यांतर्गत विभागाने रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे. मार्च २०२६ पर्यंत ६.७२ लाख किमतीच्या चोरी मालमत्तेपैकी ५.८२ लाख किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विशेष मोहिमांद्वारे अंमलबजावणी अधिक बळकट करण्यात आली. ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ प्रकरणे १२.४० लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ऑपरेशन सतर्क अंतर्गत १० प्रकरणांमध्ये अवैध मद्य व तंबाखू संदर्भात ३.४३ लाख किमतीची जप्ती करण्यात आली. तसेच, ऑपरेशन अमानत प्रवाशांच्या हरवलेल्या ७२ वस्तू, ज्यांची किंमत २०.१७ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांच्या मालकांना परत करण्यात आल्या. मानवीय दृष्टीकोनातून ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत २०२६ आतापर्यंत ६७ मुलांना (५१ मुलगे व १६ मुली) सुरक्षितपणे वाचवून त्यांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्यात आले आहे.