नागपूर,
Scrap sale मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आर्थिक वर्ष २०२५- २६ दरम्यान स्क्रॅप निपटारा व महसूल निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. सुयोग्य नियोजन व पारदर्शक प्रक्रियेच्या माध्यमातून विभागाने एकूण ६३.४७ कोटी महसूल मिळवला असून, संसाधनांच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे व योग्य वापराचे द्योतक आहे.
Scrap sale या कालावधीत विविध प्रकारच्या स्क्रॅपचा मोठ्या प्रमाणावर निपटारा करण्यात आला. यामध्ये ६६५५.८१४ मेट्रिक टन रेल्स, ३०९३.०० मेट्रिक टन पथ साहित्य तसेच ८०२६ स्लीपर्सचा समावेश आहे. याशिवाय १५३३.७२८ मेट्रिक टन फेरस स्क्रॅप व मेट्रिक टन नॉन-फेरस स्क्रॅप यांचा यशस्वी ई-लिलाव आला. तसेच ४९७.६८६ मेट्रिक टन इतर विविध स्क्रॅप व ४ डबे (वॅगन्स) यांचाही निपटारा करण्यात आला. ही कामगिरी कालबाह्य व अनुपयोगी साहित्याच्या वेळेवर निपटार्याबाबत विभागाच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. यामुळे साठा व्यवस्थापन सुधारण्यास मदत होते तसेच मौल्यवान जागा उपलब्ध होते.