पक्ष मजबुतीसाठी गटबाजी टाळा : श्वेता सिंग

*सेलू येथे काँग्रेसची जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
सेलू, 
shweta-singh : एकजुटीने काम केल्यास पक्षाची ताकद वाढेल. काँग्रेस पक्ष मजबूत करायचा असेल तर मतभेद बाजूला ठेवून गटबाजी टाळा, असे आवाहन झारखंडच्या काँग्रेस आमदार तथा वर्धा क्षेत्राच्या मुख्य पक्ष निरीक्षक श्वेता सिंग यांनी केले. यावेळी त्यांनी संघटन बळकट करण्यावर भर दिला.
 
 
 
SINGH
 
 
 
काँग्रेस पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सेलू येथे मंगळवार ७ रोजी दुपारी १ वाजता विद्यादीप सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. मेळाव्याला काँग्रेस नेत्या चारूलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शेखर शेंडे, अभ्युदय मेघे, शैलेश अग्रवाल, प्रवीण हिवरे, हमीद अली सैय्यद, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मिश्रा, जिपचे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, सुरेश ठाकरे, बाजार समितीचे संचालक काशिनाथ लोणकर, जिपचे माजी सदस्य सौरभ शेळके, विनोद लिडबे, प्रमोद आदमने, नितीन निघडे, मंगेश काळे, बाबा उडान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल आणि कार्यकर्त्यांच्या पसंतीनुसारच नवीन जिल्हाध्यक्षाची निवड केली जाईल, असेही श्वेता सिंग यांनी यावेळी सांगितले. एकूणच, आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरल्याचे मानले जात आहे.
 
 
मेळाव्यास तालुयातील विविध भागांतून पदाधिकारी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच आजी-माजी सरपंच, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.