सुषमा बाळसराफ राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षिका पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
वर्धा,
sushma balsaraf महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ व सातारा जिल्हा कलाध्यापक संघ, सातारा यांच्या संयुत वतीने आयोजित ४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद मोठ्या उत्साहात स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे संपन्न झाली. या परिषदेत सुषमा बाळसराफ यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
sushma balsaraf
 
परिषदेच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र बारई, कार्याध्यक्ष म्हणून कलासंचालक किशोर इंगळे, रयत शिक्षण संस्था साताराचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, सातारा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख, सचिव विलास शेवाळे उपस्थित होते.
 
या परिषदेत राज्यातील विविध भागांतील सुमारे ८०० हून अधिक कलाशिक्षकांनी सहभाग नोंदवला. वर्धा जिल्ह्यातील सुमारे २६ कलाशिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. दोन दिवसीय परिषदेमध्ये कलाशिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, अध्यापनातील नाविन्य, तसेच शिल्पकला, चित्रकला, नृत्यनाट्य, गायन-वादन, हस्तकला व चित्रप्रदर्शन या विविध कला प्रकारांवर सखोल चर्चा व प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सुषमा बाळसराफ यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.sushma balsaraf या परिषदेमुळे कलाशिक्षण क्षेत्रात नवीन विचारांची देवाण-घेवाण होऊन अध्यापनात अधिक सुसंगती व गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यत केले.
 
या पुरस्काराबद्दल कलाध्यापक संघाचे अध्यक्ष आशिष पोहाणे, गोवर्धन इंगळकर, धनंजय नाखले, सुभाष राठोड, मुख्याध्यापक चंद्रकांत ठाकरे, शिक्षिका भारती कार्लेकर, रेखा आत्राम, स्मिता इंगळे, अर्चना धानोरकर, वैशाली फरताडे, वनिता देशमुख, वैशाली राऊत, ज्योती पवार, ज्योत्स्ना लांबट, प्रेमलता कोहळे, अपर्णा ढवळे, वैशाली श्रीरामे, रुपाली तडस, आदींनी त्यांचे अभिनंदन केले