ट्रकची ट्रकला धडक; वाहनांचा चुराडा

*समृद्धी महामार्गावरील घटना

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
truck-collides-with-truck : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्गावर सोमवार ६ रोजी रात्री उशिरा ट्रकने ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले.
 
 
ACCI
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अवधेश यादव (४८) रा. घटकौर, उत्तर प्रदेश हे एन. एल. ०१ ए. जी. ४५३६ क्रमांकाच्या ट्रकने पुण्याहून नागपूरकडे जात होते. तर द्राक्षांनी भरलेला एम. एच. १६ डी. ९६८० क्रमांकाचा ट्रक घेऊन चालक किशोर शहाजी थोरवे (३६) रा. अहिल्यानगर हे पटनाच्या दिशेने जात होते. सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमधील चॅनल क्रमांक ३०/०० जवळ मागून येणार्‍या ट्रकने पुढे चाललेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात पुढील ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने नुकसानग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद सिंदी पोलिसांनी घेतली आहे.