देवळी,
1400 wintals of cotton burnt येथील श्रीकृष्ण जिनिंगमध्ये संजय जिनींग इंडस्ट्रीजचे नेमीचंद घिया यांनी खरेदी केलेल्या कापसाला बुधवार ८ रोजी दुपारी अचानक लागलेल्या आगीत कापसाच्या मोठ्या ढिग जळून खाक झाल्या. या आगीत अंदाजे १३०० ते १४०० विंटल कापूस जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान श्रीकृष्ण जिनिंग परिसरात ठेवलेल्या कापसाच्या ढिगाला अचानक आग लागली. येथे संजय इंडस्ट्रीजचे नेमचंद घिया यांनी खरेदी केलेला कापूस ठेवण्यात आला होता. दुपारच्या सुमारास या कापसाच्या ढिगाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही वेळातच आगीने कापसाच्या ढिगांना वेढा दिल्याने धुराचे लोळ परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताच देवळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दीर्घ प्रयत्नानंतर आग आटोयात आणण्यात यश आले. दरम्यान, देवळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. या आगीत मोठ्या प्रमाणात कापूस जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यत केला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. जिनींगमधील कामगार तसेच परिसरातील इतर जिनींग मालक विनोद घिया, नरेश अग्रवाल, अमित सुराणा, महेश अग्रवाल, संजय घिया यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला सहकार्य केले. आग तात्काळ नियंत्रणात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.