रस्त्यावरील फळ व भाजी विक्रेत्यावर कारवाई

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
वाशीम,
Action against vegetable seller शहरातील प्रमुख चौक व रस्त्यालगत हातगाडे लावून फळ व भाजीपाला विक्री करणार्‍यावर पोलिस प्रशासनाने कारवाई केली. वाशीम शहरातील रहदारीला अडथळे निर्माण करणारे मुख्य बाजारपेठ असलेले पाटणी चौक येथे फळ विक्रेते तसेच भाजीपाला विक्रेते यांचेवर विशेष कारवाई करणे करीता मोहीम राबविण्यात आली. . पाटणी चौक येथे फळविक्रेते तसेच भाजीपाला विक्रेते रस्त्यावर हातगाडया लावून विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. रस्त्यावरील हातगाड्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने फळ विक्रेते तसेच भाजीपाला विक्रेते हातगाडयावाल्यावर कलम २८५ भारतीय न्याय संहीता प्रमाणे एकुण ९ हातगाडयावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
 
 
Action against vegetable seller
 
 
तसेच वाशीम शहरात नो पार्कीग झोन मध्ये तसेच रस्त्यावर रहदारीस, वाहतुकीस अडथळा निर्माण होइल अशा धोकायदायक स्थितीत फळ विक्रेते किंवा भाजीपाला विक्रेते आढळुन आल्यास त्यांचेवर शहर वाहतुक शाखा तसेच नगर पालीका वाशीम यांचेकडुन कडक व संयुक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरची कारवाई सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नाईक यांचे मार्गदर्शनात पोहवा सुनिल गजभार, महीला पोलीस हवालदार संगिता शिंदे, पोलिस अंमलदार सुनिल वाणी, दिपक मुळे, विष्णु साबळे, अनिल हमाने, मनोज ठाकरे यांनी केली आहे.