गडचिरोली,
adv sanjay deshmukh गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघटनेची निवडणूक काल 7 एप्रिल रोजी मंगळवारी, शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व अधिवक्त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
या निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षपदी अॅड. संजय देशमुख यांची तर सचिवपदी अॅड. प्रकाश भोयर यांची निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी अॅड. उमेश मडावी, सहसचिवपदी अॅड. उमेश कुकुडकर, कोषाध्यक्षपदी अॅड. पल्लवी केदार आणि ग्रंथपालपदी अॅड. पायल धाईत यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य (महिला राखीव) पदावर अॅड. प्रिया मल्लेलवार यांची निवड झाली. तर सर्वसाधारण कार्यकारिणी सदस्य म्हणून अॅड. जितेश खोब्रागडे, अॅड. हितेश थोटे, अॅड. निलीमा जुमनाके आणि अॅड. गिरीधर बांगरे हे निवडून आले.
नवीन अध्यक्ष आणि सचिव यांनी आपल्या विजयाचे श्रेय वरिष्ठ अधिवक्ता अॅड. प्रमोद धाईत, अॅड. सचिन कुंभारे, अॅड. रवींद्र दोनाडकर, अॅड. नितेश लोडेल्लीवार, अॅड. अनिल चौधरी आणि अॅड. संजय भट्ट यांना दिले.adv sanjay deshmukh तसेच सर्व अधिक्त्यांचे सहकार्य व विश्वासामुळे हा विजय शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.