बीएलओंचे कामं विद्यार्थ्यांच्या खांद्यावर !

उन्हात पायपीट करत शालेय मुलांकडून चिठ्ठ्या वाटप

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
सेलू, 
BLO's work is for students मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रशासनाने नियुत केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांवर (बीएलओ) असलेली जबाबदारी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकली जात असल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यत होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात देशातील सर्वच राज्यात एसआयआर प्रक्रिया राबविली जात आहे. मतदार यादीचे सखोल पुनरावलोकन करणे व निर्दोष मतदार यादी बनविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. महाराष्ट्रातही ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याचे उद्दीष्ट आहे. यासाठी प्रशासनाने बीएलओची नियुती केली आहे. मात्र, काही ठिकाणी शिक्षकांनी अध्यापन बाजूला ठेवून विद्यार्थ्यांकडूनच मतदार यादीसाठी आवश्यक माहिती संकलन, पावत्या लिहून घेणे तसेच त्या घराघरांत पोहोचवण्याचे काम करून घेतल्याचा धकादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
 

SCHOOL 
 
शासनाने राष्ट्रीय स्तरावरील या मोहिमेसाठी संबंधित अधिकार्‍यांना घरभेटी, माहिती संकलन व पडताळणीची जबाबदारी दिली असताना, प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना कामाला लावले जात असल्याचे चित्र दिसत आहे. रेहकी कला परिसरात तर विद्यार्थ्यांच्या हातूनच पावत्या लिहून घेतल्या जात असून, त्या वितरित करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कडक उन्हात शालेय मुले गावोगावी फिरत असल्याचे दृश्य पाहायला मिळत असून, यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शयता व्यत केली जात आहे. कारामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांवर टाकण्यात येणारा हा अतिरित भार थांबवावा, अशी मागणी पालकांसह नागरिकांकडून केली जात आहे.
 
 
मतदार यादीचे सखोल पुनरावलोकनाची कामे शिक्षकांना देण्यात आली आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना घरोघरी चिठ्ठ्या वाटप करायला लावल्या जात आहे. आता विद्यार्थी शिक्षण सोडून उन्हातान्हात घरोघरी जाऊन चिठ्ठ्या वाटपाचे काम करीत असून यामुळे त्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत असल्याची प्रतिक्रीया रेहकी येथील पालक रमेश इवनाते यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.