सोमलवार निकालस प्राथमिक शाळेची चमकदार कामगिरी

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Somalwar Nikalas Primary School सोमलवार निकालस प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी “इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड (IMO) २०२५-२६” मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या प्रतिष्ठेत भर घातली आहे. Science Olympiad Foundation, नवी दिल्ली आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ तसेच झोनल पदके आणि इतर सन्मान पटकावले. इयत्ता दुसरीतील अधिरा मैत्र आणि अद्विका देशमुख यांनी इंटरनॅशनल रँक १ मिळवत “इंटरनॅशनल गोल्ड मेडल” जिंकले. समर्थ बाबरिया आणि आयुषी मुरहेकर यांनी इंटरनॅशनल रँक २ सह “इंटरनॅशनल सिल्व्हर मेडल” मिळवले, तर अयुरा वैद्य हिला इंटरनॅशनल रँक ३ सह “इंटरनॅशनल ब्रॉन्झ मेडल” मिळाले.
 
Somalwar Nikalas Primary School
 
याच इयत्तेतील जान्हवी चौधरी हिला झोनल गोल्ड मेडल, तर सान्वी गजभिये, स्तुती मानकर आणि इशान्वी धांद्रे यांना झोनल ब्रॉन्झ मेडल प्राप्त झाले “गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन” मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अश्रिया राऊत, भार्गवी शरणागत, इरा बावने, नैवेद्या साहू, सावी ठोसर, Somalwar Nikalas Primary School सौम्या देशमुख, तारिणी कुलकर्णी, अभिनव ठेंगणे, सान्वी बावने, युक्ती चौधरी, रिधान बोरिकर, शार्विल फटिंग, श्रीयुत झंझाळ आणि स्वक्ष देशमुख (सर्व इयत्ता दुसरी) यांचा समावेश आहे.
 
“गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स” इयत्ता दुसरीतील अद्वेद रन्नावरे, श्रीदत्त बुद्धे, प्रचीती डहाके, विधी कामडे, अर्णव पिंपळापुरे, मल्हार गुडधे, रुग्वेद काकडे, समर्थ निखाडे आणि श्लोक बकाल; इयत्ता तिसरीतील प्रियांक कोळणकर, Somalwar Nikalas Primary School आदित्य हजारे, वंश राठी, आदिनाथ सातपुते, अभिज्ञा देशपांडे, वृषांत क्षिरसागर, वेद ठाकूर, रिया मोनापुरे आणि ऊर्जित घुगल; तसेच इयत्ता चौथीतील आर्या लुलेकर, धीरा खंते, मैत्रेयी धानोरकर, पलाक्षी जांभुळकर, श्राव्या गाडे आणि मनस्वी मालवी यांनी मिळवले. या यशाबद्दल सोमलवार अकॅडमीचे सचिव प्रकाश सोमलवार, मुख्याध्यापिका अदिती डोळे, पर्यवेक्षिका अश्विनी ठोसर तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना माधवी पांढरीपांडे, निलिमा हरगुडे आणि पूर्वा माटे यांनी मार्गदर्शन केले.
सौजन्य: माधवी पांढरीपांडे, संपर्क मित्र