हवालदार सागर जाधवला 'वसुली भाई' म्हणून ओळख

वसुली प्रकरण पोहचले पोलीस आयुक्तांकडे

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
पुणे,
bribery-extortion-case : शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार सागर जाधव यांच्यावर गंभीर आरोप समोर आले आहेत. विजय मल्लिकार्जुन कोळी यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली असून, लाच व खंडणीचा आरोप यात केला आहे.
 
 
 
PUNE
 
 
तक्रारीनुसार, सागर जाधव यांनी जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीकडून ‘गेट जामीन’ मिळवून देण्याचा आमिष दाखवत एकूण जवळपास ५ लाख रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. यात २ लाख २५ हजार रुपये विजय कोळीच्या मित्राकडून आणि २ लाख ५० हजार रुपये दुसऱ्या व्यक्तीकडून उकळल्याचे नमूद केले आहे.
 
तक्रारीत असेही सांगितले आहे की, सागर जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त १ लाख रुपये दिल्याचे दाखवले, तरी संपूर्ण प्रकरणात वसुली चालू होती. यापूर्वी तो खडकी पोलीस ठाण्यातही अशा प्रकारच्या चर्चेत होता.
 
सागर जाधव शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये 'वसुली भाई' म्हणून ओळखला जातो. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वी अशा प्रकारांवर कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले असून, आता या प्रकरणात सखोल चौकशी होणार आहे. दोषी असल्यास कारवाई होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.