मायक्रोव्हॅस्युलर शस्त्रक्रियेमुळे कापलेला हात वाचवण्यात डॉटरांना यश

*इलेट्रिक सॉमुळे हाताला झाली होती गंभीर दुखापत

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
वर्धा,
microvascular surgery एका ४० वर्षीय इलेट्रिशियनला राहत्या घरी लाकडी ब्लॉक कापताना इलेट्रिक सॉमुळे हाताला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यामधील सर्व स्नायू, रक्तवाहिन्या आणि नसा पूर्णपणे कापल्या गेल्या. त्यामुळे हात वाचण्याचा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर मायक्रोव्हॅस्युलर शस्त्रक्रिया करून हात वाचवण्यात डॉक्टरांना  यश आले.
 

मायक्रोव्हॅस्युलर शस्त्रक्रियेमुळे कापलेला हात  
 
 
अपघातानंतर इलेट्रिशियनवर एका स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय (एव्हीबीआरएच) येथे पाठवण्यात आले. प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे डॉ. फिरोज बोरले आणि त्यांच्या चमूने तात्काळ रुग्णाची तपासणी करून विलंब न करता आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पहाटे ४ वाजेपर्यंत चाललेल्या पाच तासांच्या एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये डॉटरांनी उच्च क्षमतेच्या मायक्रोस्कोपच्या मदतीने कापलेले सर्व स्नायू, धमन्या, शिरा आणि नसा काळजीपूर्वक जोडले. यावेळी केलेल्या उपचारामुळे हातात पुन्हा रतपुरवठा सुरू झाला आणि हाताची कार्यक्षमता वाचवण्यात यश आले.
डॉ. बोरले यांनी सांगितले की, जर वेळेत शस्त्रक्रिया झाली नसती तर रुग्णाला गँगरीन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असता, ज्यामुळे कदाचित हात कापावा लागला असता आणि रुग्णाला कायमचे अपंगत्व आले असते. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आता रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.microvascular surgery हाताची पूर्ण हालचाल आणि ताकद परत मिळवण्यासाठी त्यांना फिजिओथेरपीची गरज आहे. ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा इलेट्रिशियन म्हणून काम सुरू करू शकतील, अशी अपेक्षाही डॉ. बोरले यांनी व्यत केली.