गोंदिया,
laxman-yadav : दिल्ली विश्व विद्यालयाचे पूर्व व्याख्याते, प्रसिद्ध ओबीसी, आदिवासी व आंबेडकरी विचारवंत, लेखक, राजकीय विश्लेषक डॉ. लक्ष्मण यादव यांचे रविवारी १२ एप्रिल रोजी जवळील कुडवा येथील आंबेडकर चौकात जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त करण्यात आले असून त्याचबरोबर तीन दिवसीय जयंती महोत्सव कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात येणार आहे. यात सोमवारी १३ एप्रिल रोजी चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध कलावंतांद्वारे धम्मज्योत भिमस्वरांजली या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. तसेच मंगळवारी १४ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक व भोजनदान कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. तीन दिवस चालणार्या या भीम जयंती महोत्सव कार्यक्रमाचे परिसरातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन राजगृह बुद्ध विहार स्मारक समिती तर्फे करण्यात आले आहे.