वर्धा,
Email directly toCM गोपुरी चौक ते राष्ट्रीय महामार्ग ३६१ रस्ता कामातील कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. सदर रस्त्याचे अर्धवट काम असून याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. धुळीमुळे अनेकांना श्वसन आणि डोळ्यांचे आजार बळावत आहे. अपघाताच्या घटनाही घडत असताना संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली. आंदोलनेही करण्यात आली. नुकतेच रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले. ३१ मार्चपर्यंत रस्ता काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले. मात्र, एप्रिल महिना अर्धा संपत आला असतानाही काम सुरूच झाले नाही. दरम्यान, संतप्त नागरिकांनी सदर अपूर्ण रस्त्यासाठी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच ई-मेल पाठविले आहे. इंदरदीप कन्स्ट्रशन कंपनीचा कंत्राट रद्द करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे.

गोपुरी चौक ते साटोडा बायपास सिमेंट रस्त्याचे बांधकाम दोन वर्षांपासून सुरू असताना अद्याप ५० टकेही पूर्ण झालेले नाही. कधी १०० मीटर तर कधी २०० मीटर असा तीन-चार महिन्यानंतर रस्त्याचे काम सुरू आहे. एका बाजूने रस्त्याचे काम करण्यात आले असून सळाखी दोन फूट बाहेर आहेत. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अर्धवट रस्ता बांधकामामुळे धुळीचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले आहे. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिले, मात्र कामाची गती वाढली नाही. या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी ग्रापं पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले यांना निवेदन देत दोन दिवसात काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.
सेवाग्रामचे ठाणेदार, कनिष्ठ अभियंता, नायब तहसीलदार धर्माधिकारी यांनी मध्यस्थी केल्यानंतर सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र दिले. कंत्राटदार कंपनीवर ११ मार्च २०२५ पासून प्रतिदिवस ५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचे कळविले. तसेच ३१ मार्चपर्यंत काम सुरू न झाल्यास काम काढून घेण्याचेही पत्रात नमूद केले. कंपनीच्या कंत्राटदारांनी २३ मार्चपासून काम सुरू करून पूर्ण करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, अद्यापही हे काम सुरू झाले नाही. दरम्यान, कंत्राटदाराबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून आता संतप्त नागरिकांनी अपूर्ण रस्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठविला आहे. सदर कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्याचे कंत्राट तात्काळ रद्द करण्यात यावे, नवीन एजन्सीमार्फत हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे आणि जनतेची गैरसोय करणार्या अशा आहे.