वराेरा-भटाळ्यातील प्रागैतिहासिक स्थळांची तज्ज्ञांकडून पाहणी

- गैरकायदेशीररित्या खाणीचे उत्खनन : जिल्हाधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
inspect prehistoric sites चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा तालुक्यातील भटाळा व माेवाड गावांमध्ये असलेल्या भाेंडा महादेव क्षेत्रातील प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांची स्थिती तपासण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांसह सात सदस्यीय पथकाने पाहणी केली. पथकाने भटाळा येथील महादेव मंदीर, भवानी मंदीर, श्रृषी तलाव, लेणी काेरीव काम, शिळा व इतर 172 छायाचित्रे काढून उच्च न्यायालयात सादर केली. याप्रकरणी न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्यायमूर्ती राज वाकाेडे यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह इतर प्रतिवादींना नाेटीस बजावून 18 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. 18 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर सादर केले नाही तर त्यांना साेमवारी, 20 एप्रिल राेजी वैयक्तीक हजर राहण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिलेत.
 

वराेरा-भटाळ्यातील प्रागैतिहासिक स्थळां 
 
भाेंडा महादेव क्षेत्र हे अनाेख्या वास्तुकलेसह विदर्भातील सर्वात माेठ्या शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील प्रागैतिहासिक स्थळांच्या संरक्षण व सुरक्षेबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत हायकाेटार्ने जनहित याचिका दाखल करवून घेतली आहे. ही स्थळे मध्य भारतातील प्रागैतिहासिक सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून येथील अवशेष सुमारे 20 लाख वर्षे जुने मानले जातात. मात्र, अनियंत्रित खनन, दगड खाणी व नैसर्गिक झीज यामुळे हे पुरातत्त्वीय क्षेत्र झपाट्याने नष्ट हाेत असल्याचे संशाेधक व वारसा तज्ज्ञांनी निदर्शनास आणले आहे.inspect prehistoric sites तसेच या परिसरातील सुमारे 75 टक्के पुरातत्त्वीय अवशेष आधीच नष्ट झाले आहेत. या भागात गैरकायदेशीररित्या खाणीचे उत्खनन केले जात असल्याचेही हायकाेर्टाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना 18 एप्रिलपर्यंत अहवाल सादर न केल्यास वैयक्तीक हजर राहण्याचे आदेश दिलेत. काेर्ट मित्र अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी , केंद्र सरकारर्ते अ‍ॅड.शुकूल यांनी बाजू मांडली.