गडचिरोली,
football team wins नांदेड येथे 6 एप्रिलपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा गट ‘अ’ फुटबॉल स्पर्धेत गडचिरोली जिल्हा फुटबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात अमरावती संघाचा पराभव करून गडचिरोलीने हा किताब आपल्या नावावर केला.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत नंदुरबार, लातूर, बीड, नांदेड, गोंदिया, अमरावती, गडचिरोली व सोलापूर अशा आठ संघांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली संघाने पहिल्याच सामन्यात नंदुरबारवर 5-1 अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.football team wins त्यानंतर उपांत्य सामन्यात नांदेड संघावर 2-0 अशी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात अमरावती संघावर मात करत गडचिरोलीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या यशाबद्दल गडचिरोली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र दरेकर, सचिव सतीश पवार तसेच तांत्रिक सल्लागार विजय सुमारे यांनी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक प्रशांत मलिक व व्यवस्थापक एम. एस. सरकार यांचे अभिनंदन केले. तसेच संघाला कोचिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे आभार मानण्यात आले आहेत.