गाेदामातून सिलेंडर घेऊन नागरिकांनी काढला पळ

- सिलेंडर डिलिव्हरच्या मॅसेजने उडाला गाेंधळ - पाेलिस बंदाेबस्तात सिलेंडरचे वाटप

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
hp-gas-godam-nagpur : नारी राेडवरील एचपी गॅस गाेदामासमाेर बुधवारी सकाळी सात वाजतापासून माेठी गर्दी उसळली हाेती. यादरम्यान एकच गाेंधळ उडाला. काही जणांनी गाेदामावर असलेल्या कर्मचाèयाला मारहाण करुन भरलेले सिलेंडर उचलून पळापळ केली. त्यामुळे जरीपटका पाेलिसांनी हस्तक्षेप करीत पाेलिस बंदाेबस्तात सिलेेंडरचे वितरण केले.
 
 
KL
 
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सात वाजता नारी राेडवरील एचपीच्या गाेदामावर ग्राहकांची माेठी गर्दी हाेती. गाेदामावरील कर्मचारी नागरिकांची समजूत घालून रांगा लावण्यासाठी सांगत हाेते. मात्र, काही ग्राहकांनी कर्मचाèयाला शिविगाळ आणि मारहाण केली. काही जणांनी चक्क गाेदामात प्रवेश करीत भरलेले सिलेंडर घेऊन पळ काढला. त्यामुळे एकच गाेंधळ उडाला. शेवटी जरीपटका पाेलिस गाेदामावर पाेहचले. त्यांनी ग्राहकांची समजूत घातली. त्यानंतर ज्या ग्राहकांनी सिलेंडर पळवले, त्यांच्याकडून सिलेंडर परत मिळवले. मात्र, या प्रकारामुळे माेठा गाेंधळ उडाला हाेता, हे विशेष.
 
 
काही ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा मॅसेज आल्यामुळे ग्राहकांनी गाेदामावर गर्दी केली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे पाेलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सुरळीतपणे सिलेंडरचे वितरण करण्यात आले.
- अनिल ताकसांडे (ठाणेदार, जरीपटका पाेलिस स्टेशन)