विजयी ईश्वरी पांडे हिचे नागपुरात आगमन

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Ishwari Pandey शार्क ॲक्वाटिक स्पोर्टिंग असोसिएशन, नागपूर यांच्या वतीने सर्व पालक, जलतरणपटू व जलतरण प्रेमींना कळविण्यात येते की, आपल्या क्लबची जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने ६ एप्रिल २०२६ रोजी पाल्क सामुद्रधुनी (तलाई मन्नार ते धनुष्कोडी) हे आव्हानात्मक अंतर ११ तास १५ मिनिटांत यशस्वीरित्या पार केले असून, ती ही कामगिरी करणारी जगातील पहिली दृष्टीहीन जलतरणपटू ठरली आहे.

pande 
 
 
तिचे नागपूर (संत्रा नगरी) येथे आगमन गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता, पाँडिचेरी–न्यू दिल्ली एक्सप्रेस (गाडी क्र. 22403) द्वारे होणार आहे. Ishwari Pandey तिचे स्वागत नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वार (पश्चिम) येथे करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभिमानास्पद क्षणाचे साक्षीदार व्हावे व तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करावा, ही नम्र विनंती.विजयी मिरवणूक मार्ग : मेडिकल चौक – क्रीडा चौक – आयडीसीपीई कॉलेज – आशीर्वाद नगर वेळ : सकाळी ७:४५ वाजता
सौजन्य:संजय वाटवे,संपर्क मित्र