घरगुती गॅस नियमांत मोठा बदल, १ जुलैपासून एलपीजीवर मर्यादा

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Limits on LPG from July 1 घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून मोठे बदल करण्यात येणार आहेत. विशेषतः ज्या भागात पाइपद्वारे नैसर्गिक वायू सुविधा उपलब्ध आहे, अशा परिसरात एलपीजी सिलिंडरचा वापर मर्यादित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नव्या नियमानुसार, १ जुलैपासून पीएनजी कनेक्शन असलेल्या घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार नाही. त्यामुळे या भागातील ग्राहकांना नैसर्गिक वायूचा वापर बंधनकारक होईल.ज्या घरांमध्ये दुहेरी कनेक्शन एलपीजी आणि पीएनजी उपलब्ध आहे, त्यांना एलपीजीकनेक्शन बंद करण्यास सांगण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांची माहिती संबंधित यंत्रणांकडून गोळा करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
 
 

lpg png 
पीएनजीकनेक्शन मिळवण्यासाठी घराच्या ३०० मीटर परिसरात सुविधा उपलब्ध असल्यास ग्राहकांना आठवडाभरात कनेक्शन मिळू शकते. यासाठी साधारण काही हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो, त्यामुळे ग्राहकांनी तयारी ठेवावी लागणार आहे.मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये पीएनजी सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. मात्र अनेक नागरिक अजूनही एलपीजी सिलिंडरचा वापर करत आहेत, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे आणि काळ्या बाजारातील व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पीएनजी वापरावर भर दिला जात आहे. या नव्या नियमांमुळे घरगुती गॅस वापराच्या पद्धतीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.