बुलढाणा
Maha Aarti Junagaon शहरातील जुनागाव परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या देवीची भव्यदिव्य वहन यात्रा अत्यंत भक्तिभाव, परंपरा आणि उत्साहात पार पडली. बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते तथा युवानेते मृत्युंजय गायकवाड आणि नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते आई भवानीची महाआरती अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दोघांनीही मनोभावे महाआरती करत उपस्थित भाविकांना भक्तीमय अनुभव दिला. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
Maha Aarti Junagaon यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेली पारंपरिक १२ गाडी ओढण्याची प्रथा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. भाविकांनी श्रद्धेने गाड्या ओढत आपले नवस पूर्ण केले. जय भवानी, जय जगदंबाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आणि रंगीबेरंगी सजावटीत ही यात्रा अधिकच आकर्षक ठरली. यात्रेच्या अनुषंगाने जुनागाव येथील श्री हनुमान मंदिरातून जगदंबा देवीची मूर्ती वहनाच्या आदल्या दिवशी मोठ्या देवीच्या मंदिरात नेण्यात येते. दोन मातांची ही पारंपरिक भेट भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरते.
Maha Aarti Junagaon पारंपरिक रितीरिवाज, शिस्तबद्ध आयोजन आणि आकर्षक सजावट यामुळे यात्रेला एक वेगळेच वैभव प्राप्त झाले होते. यावेळी मृत्युंजय गायकवाड यांनी मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत ढोल-ताशांच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य करत वातावरणात अधिकच रंगत भरली. संपूर्ण सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. महाआरतीनंतर नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांनी स्वतः उपस्थित भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप केले. यावेळी त्याठिकाणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे, शिवसेना शहर प्रमुख आशिष जाधव, संतोषराव वाकडे, दीपक तुपकर, श्रीकांत गायकवाड, नगरसेवक बबलू मावतवाल, नगरसेवक नयनप्रकाश शर्मा, सुनील बरडे, गणेश यंगड, मंगेश बिडवे, आप्पा शिंदे, मल्हारी गायकवाड, संतोष तुपकर, अनिल जगताप, संतोषराव राजपूत, यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त, माता-भगिनी, शिवसैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.