महावितरण अभियंत्याला लाच घेताना अटक

धारणी महावितरण उपविभागात प्रचंड भ्रष्टाचार

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
धारणी, 
bribery-case : एका ग्राहकाकडून बुधवारी दुपारी चार हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण उपविभाग, धारणीचा अभियंता सुशांत बावनगडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
 
 
J
 
 
 
केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सौर उर्जा अभियानात भाग घेणार्‍यांना ४ ते ८ हजारापर्यंतची मागणी बावनगडे नेहमी कराचे म्हणून एका ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीला संपर्क करुन या भ्रष्टाचारी सुशांतचा पंचनामा करुन टाकला. ८ एप्रिलच्या दुपारी महावितरण धारणीच्या कार्यालयातच ४ हजाराची लाच घेताना पथकाने पकडून कारवाई यशस्वी केल्याने मेळघाटात भ्रष्टाचार किती वाढला आहे हे समोर आले आहे.
 
 
देशात विजेचा तुटवडा आणि उपयोगाचे महत्व लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर उर्जेवर आधारित योजनांसाठी अनुदान सुरू करुन नागरिकांना प्रोत्साहित केले. मात्र, भ्रष्ट अधिकारी ही योजना मंजुरीसाठी ४ ते ८ हजाराची लाच मागून शासनाच्या योजनेला छेद देत आहेत. धारणी येथील जवळपास प्रत्येक शासकीय कार्यालयात भ्रष्ट कर्मचार्‍यांची उपस्थिती असल्याने अनुदानित योजना असो की डीबीटी लाच घेणे-देणे असा नियमच झालेला आहे, हे विशष!
 
 
अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पो. नि. योगीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आजची यशस्वी कारवाई करण्यात आल्याने मेळघाटात आनंदाची लाट पसरलेली आहे. बातमी लिहेपर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे सौर उर्जेच्या लाभार्थी ग्राहक आता अनुभव सांगत असल्याने अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.