वर्धा,
Pawanur Gal Rath Yatra तालुक्यातील पवनूर येथे ३०७ वर्षांची परंपरा जपत ७ रोजी विदर्भातील एकमेव गळाच्या रथयात्रेत भतांची मोठी गर्दी उसळली. यावेळी जय हो पाताळ माताच्या गजराने संपूर्ण पवनूरनगरी दुमदुमून गेली. ही रथयात्रा गावातील मध्यभागातून निघून पाताळ माता मंदिरात समारोप झाला. गेल्या ३०७ वर्षांपासून या रथयात्रेला मोठी परंपरा लाभलेली आहे. पवनूर गावाला कुठलेही अरिष्ट येऊ नये व सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी या यात्रेचे आयोजन केले जाते. लाकडी जूच्या दोन्ही भागात दोन भगत लटकविले असतात. यावर्षी अरुण लांडे व मारोती दाभेकर हे ५० फूट उंचीवर लाकडी जूला लटकून परिक्रमा करून याचा समारोप गावातील शेवटच्या टोकावर असलेल्या पाताळ माता मंदिरात झाला. हे मंदिर गावाचे ग्रामदैवत असून या ग्रामदेवतेवर गावकर्यांची निस्सीम श्रद्धा आहे. यावेळी हा लाकडी रथ अतिशय आकर्षक सजविलेला होता. भगत अरुण लांडे व मारोती दाभेकर हे गावातील पूर्ण परिक्रमा करून माता मंदिरामध्ये समारोप झाला.
गळाचा रथ सजविण्यासाठी प्रवीण महात्मे, प्रवीण चौधरी, आशिष दाभेकर, गणेश कारणकर, खुशाल राऊत, प्रवीण महात्मे, राजेश कडू, विक्रम कडू, रोशन धाकुलकर, रामाजी देशमुख, निळकंठ राऊत, अनूप चौधरी, नयन चौधरी, धनराज कोंडलकर, दिनेश कोंडलकर, रोशन पांडे, सुरेंद्र कारणकर यांनी सहकार्य केले. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी खरांगणाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, गोपनीय शाखेचे पोलिस अंमलदार सतीश अहेर, दिनेश धवणे, किशोर वाडेकर, प्रशांत चिंचोणे, पोलिस पाटील हेमलता गवळी-पाटणकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.