पुणे,
bribery-case : पदोन्नतीसाठी शिक्षण सेवकाकडून पावणेतीन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे.
तक्रारीनुसार, शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजेश खंदारेनी पदोन्नतीसाठी अनुकूल प्रस्ताव पाठवण्याच्या बहाण्यावर तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्याने पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून २५ हजार रुपये घेतले.
तक्रारीनंतर एसीबीने सापळा लावून खंदारे, अनिल रंधवे आणि आतिश शिंदे यांना पकडले. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी केली. सहायक आयुक्त नीता मिसाळ प्रकरणाचा तपास करत आहेत.