तभा वृत्तसेवा
दारव्हा,
rape-of-a-minor-girl : पोक्सो कायद्यांतर्गत दारव्हा विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश संजीवकुमार नरवाडे यांनी मंगळवार, 7 एप्रिलला निकाल देत आरोपी तुकाराम किसन शिंगाडे (जवळा, ता. आर्णी) याला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी 10 वर्षे कठोर कारावास व 60000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. एकूण दंडाच्या रकमेतून 50000 रुपये पीडितेला देण्यात यावे असा आदेश पारीत केला.

आरोपीने पीडितेला तुला 50 रुपये देतो माझ्या घरातील भांडे धुवून दे, असे म्हटल्यावर तिने नाही म्हटले असता तिला जबरदस्तीने घरामध्ये नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने तिच्या आईला ही घटना सांगितली.मुलीच्या आईने त्याच दिवशी आर्णी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. तपास अधिकारी सपोनि नागेश जायले यांनी तपास करून दारव्हा विशेष न्यायालयात आरोपी तुकाराम शिंगाडेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणात सरकार पक्षाकडून एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार न्या. नरवाडे यांनी आरोपीला दोषी ठरवून कठोर शिक्षा दिली. या प्रकरणात सरकारी वकील अॅड. संजयप्रताप चव्हाण यांनी बाजू मांडली. पैरवी सहपोलिस उपनिरीक्षक गजानन भगत यांनी सहकार्य केले.