कारंजा लाड,
Riyansha's brilliant performance शहराच्या शैक्षणिक विश्वात अभिमानाची नवी नोंद करत सागा सुपर अबॅकस अकॅडमीच्या इयत्ता दुसरीत शिकणार्या रियांशा इंगोले ने राष्ट्रीय स्तरावर आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली. संभाजीनगर येथे नुकताच कै. भानुदासराव चव्हाण स्मृती सभागृहात पार पडलेल्या सुपर अबॅकस राष्ट्रीय चॅम्पियनशिप अवॉर्ड सोहळ्यात सन्मान करण्यात आला. या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. संचालिका अश्विनी शेगोकार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तिने उत्कृष्ट कामगिरी करत यशाचे शिखर गाठले. रियांशा स्वप्निल इंगोले हिने ६ मिनिटात योग्य उत्तरे ऑनलाईन देऊन ९९ गुण प्राप्त केले. त्यासाठी तिला काँग्रॅच्युलेशन ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य वन विभागाचे सचिव सुजय दोडल, प्रसिद्ध उद्योजक विनोद जैन आणि सुपर अबॅकसचे संचालक मनीष महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून कारंजात कार्यरत असलेली सागा सुपर अबॅकस अकॅडमी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी, मानसिक गणित कौशल्य वाढवण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्य करत आहे. संचालिका अश्विनी शेगोकार आणि व्यवस्थापक राहुल शेगोकार यांच्या अथक परिश्रमाचे हे यशस्वी फलित मानले जात आहे. या सोहळ्यात अश्विनी शेगोकार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘नवरात्री फेस्टिवल अवॉर्ड’ आणि ‘इम्पॅक्ट वुमन अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. हा सन्मान त्यांच्या समर्पणाचा जिवंत पुरावा ठरला.