आरपीएफची 3 महिन्यांत 2607 जणांवर कारवाई

- 16.05 लाखांचा दंड वसूल

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
rpf action रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नागपूर विभागाने 2026 च्या पहिल्या तिमाहीत माेठ्या प्रमाणावर कारवाई करीत 2,843 प्रकरणे नाेंदवली असून 2,607 आराेपींना अटक केली आहे. या कारवायांमधून एकूण 16.05 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षी म्हणजे 2025 मध्ये हा दंड वसुलीचा आकडा 1.05 काेटी रुपयांपेक्षा अधिक हाेता.
 

आरपीएफची 3 महिन्यांत 2607 जणांवर  
 
 
तसेच रेल्वे संपत्ती (अनधिकृत कब्जा) कायद्यांतर्गत 2026 मध्ये आतापर्यंत 6.72 लाख रुपये किमतीच्या चाेरीच्या मुद्देमालाच्या तुलनेत 5.82 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विशेष माेहिमांअंतर्गत ‘ऑपरेशन नार्काेस’मध्ये 7 प्रकरणे नाेंदवून 12.40 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत 10 प्रकरणांमध्ये 3.43 लाख रुपयांची अवैध दारू व तंबाखू जप्त करण्यात आली. तसेच ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत प्रवाशांच्या 20.17 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या 72 हरवलेल्या वस्तू शाेधून त्यांना परत करण्यात आल्या. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ माेहिमेद्वारे 67 मुलांना वाचवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.