सक्षम कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनात जनता विद्यालयाचा डंका

*विद्यार्थ्यांच्या उद्योजकता कौशल्याचे कौतुक

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
janata-vidyalaya : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि उद्यम लर्निंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सक्षम जिल्हास्तरीय प्रदर्शन २०२६ मध्ये जनता विद्यालय पी. सराई च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि व्यावसायिक कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दि ७ एप्रिल रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे संपन्न झालेल्या या प्रदर्शनात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योगाचे मॉडेल सादर करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
 
 
J LK 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य भटकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक जिल्हा शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, ज्येष्ठ अधिव्याख्याता समाधान डुकरे , गायकवाड सर, इमाम मिर्झा आणि कार्यक्रम प्रमुख प्रशांत पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यालयाच्या स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या ’बिझनेस माइंडसेट’चे विशेष कौतुक केले व त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. या विशेषप्रसंगी, विद्यालयाच्या यशात मोलाची भूमिका बजावणारे आणि सतत प्रोत्साहन देणारे प्राचार्य श्री. प्रमोद ठोंबरे सर यांचा व मार्गदर्शक शिक्षक श्री नितीन शेळके सर व सहभागी विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
 
 
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला व सर्व संचालक मंडळाचे व स्थानिक सल्लागार समिती सदस्य यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले आहे. तसेच विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे , पर्यवेक्षक पिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी शिक्षक नितीन शेळके यांनी या उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले.