अनिल कांबळे
नागपूर,
sbl-company : गणेशपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दाेसरभवन चाैकातील एका घरात मिळालेल्या स्ाेटकासंदर्भात पाेलिसांच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात पाेलिसांनी एसबीएल कंपनीच्या मार्केटिंग सेल्स मॅनेजर तसेच वितरकांची चाैकशी करण्याचा निर्णय घेतला असून, संबंधितांना नाेटीस पाठवण्यात आली आहे. ही स्फोटके ज्याला विक्री करण्यात आली आहे, त्याची माहिती पाेलिस घेत आहेत.

बिंजाणी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. उज्ज्वल लांजेवार यांच्या घराच्या अंगणातील बागेत माेठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आढळून आले हाेते. या घटनेमुळे परिसरात माेठी खळबळ उडाली हाेती. पाेलिसांनी घटनास्थळावरून 58 डिटाेनेटर, 15 कार्ट्रिज आणि 8 कनेक्टर जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे स्फोटक साहित्य एसबीएल कंपनीचे असल्याचे समाेर आले आहे. या पृष्टभूमीवर पाेलिसांनी कंपनीशी पत्रव्यवहार करुन संबंधित स्फोटक साहित्य कुणाला? , केव्हा ? आणि काेणत्या अधिकृत विक्रेत्यार्माफत विकले गेले याबाबत सविस्तर माहिती मागवली आहे. तसेच या प्रकरणात पेट्राेलियम अँड एक्सप्लाेसिव्ह सेफफ्टी ऑर्गनायझेशन(पेसाे) कडूनही माहिती मागवण्यात आली आहे. या प्रकरणी गणेशपेठ पाेलिस ठाण्यात अज्ञात आराेपीविरुद्ध भारतीय दंड संहितेची कलम 288 तसेच स्फोटक अधिनियमाच्या कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पाेलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.
4 महिन्यांपासून पडून हाेती बॅग
मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोटक साहित्य असलेला बॅग मागील सुमारे चार महिन्यांपासून घराच्या एका कमी वदर्ळीच्या भागात ठेवलेला हाेता. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्राचार्यांचा मुलगा ओजस हा बागेत झाडांना पाणी घालत असताना त्याच्या नजरेस (एक्स्प्लाेसिव्ह) असे लिहिलेली संशयास्पद बॅग पडली. त्याने ही बाब माेठा भाऊ अमाेघ याला सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पाेलिसांना कळवले.
पाेलिसांची गस्त वाढली
दाेसरभवन परिसरात आजही पाेलिसांची गस्त माेठ्या प्रमाणात हाेती. या प्रकरणाचा सखाेल तपास करण्यासाठी पाेलिसांनी एसबीएल कंपनी तसेच पेसाे यांना पत्र पाठवले आहे. स्फोटक साहित्याचा स्त्राेत, अधिकृत विक्रेते आणि विक्रीची नाेंद याबाबत माहिती घेतली जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू
स्फोटक साहित्य डाॅ. लांजेवार यांच्या घरापर्यंत कसे पाेहाेचले, याचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून संशयित हालचालींचा मागाेवा घेतला जात आहे. या प्रकरणामागील हेतू काय हाेता, याचाही विविध अंगांनी तपास सुरू आहे. सध्या पाेलिस सतर्क असून, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.