समग्र शिक्षा अभियानाची सामाजिक अंकेक्षण जनसुनावणी

१३२ शाळांतील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
Social Audit Public Hearing महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी (मंत्रालय, मुंबई) अंतर्गत आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद पुरस्कृत समग्र शिक्षा अभियान सामाजिक अंकेक्षण जनसुनावणी मंगळवार ७ रोजी वर्धा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. या जनसुनावणीत तालुयातील १३२ शाळांचा भौतिक विकास, विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा आणि प्राप्त निधीचा विनियोग यावर चर्चा करण्यात आली. जनसुनावणीसाठी पॅनल सदस्य म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता संजय नवले, दत्तपूर येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे प्रकल्प सहाय्यक राहुल डंबारे, सामाजिक अंकेक्षण सोसायटीचे जिल्हा साधन व्यती नेमीचंद चव्हाण, उमेदच्या शुभांगी कोहळे, गटशिक्षणाधिकारी धर्मपाल कुमरे, शुभम कंटाळे यांची उपस्थिती होती.
 
 
Social Audit Public Hearing
 
 
सुरूवातीला रोखपाल तथा वरिष्ठ लेखा लिपीक रविकांत देशमुख यांनी अंकेक्षणाच्या सर्व मुद्यांचे वाचन केले. यामध्ये प्रामुख्याने शालेय पायाभूत सुविधा, शाळांमधील वर्गखोल्या, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सद्यस्थिती आदींचा समावेश होता. विद्यार्थी कल्याणच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सवलती, गणवेश, पाठ्यपुस्तके आणि विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांसाठीचा (सीडब्यूएसएन) प्रवास भत्ता व इतर लाभ, समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना प्राप्त झालेला निधी आणि त्याचा विहित नियमांनुसार झालेला खर्च, शाळेच्या प्रगतीत पालक आणि ग्रामस्थांचा सहभाग व प्रशासकीय पारदर्शकता याविषयीही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या सुनावणीला वर्धा तालुयातील १३२ शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रातील सर्व विशेष शिक्षक तसेच समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती वर्धा येथील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
शिक्षकांच्या अडचणीही जाणल्या
शिक्षकांना येणार्‍या अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही यावेळी मते जाणून घेण्यात आली. अंकेक्षण प्रक्रियेमुळे शालेय कामकाजात अधिक पारदर्शकता निर्माण होऊन त्रुटी दूर करण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यत करण्यात आला.