नागपूर,
blind Ishwari Pandey अतुलनीय जिद्द आणि धैर्य दाखवत नागपूरची १७ वर्षीय दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पाल्क सामुद्रधुनी पार करणारी ती पूर्णतः अंध असलेली जगातील पहिली जलतरणपटू ठरली आहे. ईश्वरीने तालैमन्नार येथील उर्मलाई पॉईंटवरून ६ एप्रिल रोजी पहाटे ४:०० वाजता जलतरणास सुरुवात केली. तब्बल ११ तास १५ मिनिटे अखंड पोहत ती धनुष्कोडी येथील अरिचलमुनई येथे दुपारी ३:१५ वाजता पोहोचली.
या प्रवासात तिने समुद्रातील प्रबळ लाटा, बदलते भरती-ओहोटीचे स्वरूप आणि जेलीफिश यांसारख्या अडचणींवर मात करत विलक्षण धाडस दाखवले. blind Ishwari Pandey जन्मापासून दृष्टीहीन असतानाही ईश्वरीने खुल्या पाण्यातील जलतरणात सातत्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. ईश्वरीची ही कामगिरी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
सौजन्य: काजल छेती, संपर्क मित्र