‘हा देश संपवू देणार नाही’

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणी नागरिकांच्या कृत्याने जग हळहळलं

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
तेहरान
Iran war अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष आता या युद्धाकडे लागलं आहे. एकीकडे युद्धविराम तर दुसरीकडे इराणसाठी कोणती  रात्र ही शेवटीच रात्र असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच इराणमधील लोक मोठ्या संख्येनं आता पुलांवर आणि विज केंद्रावर एकत्र आले आहे. मानवी साखळी करून इराणी लोक आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आली आहे. हे दृश्य पाहून जगभरात खळबळ उडाली आहे.
 
 
Iran war  इराणमध्ये  हा दिवस हा इतर दिवसांपेक्षा वेगळा ठरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिल्यानंतर शेकडो इराणी लोक रस्त्यावर उतरले. उड्डाणपुल आणि वीज केंद्रावर लोक जमा झाले. अमेरिकन सैन्य हे इराणच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करेल अशी शक्यताा आहे. त्यामुळे जरी  तेहरानने युद्ध थांबवण्याच्या त्यांच्या मागण्या मान्य केल्या , तरी हा हल्ला अटळ आहे, असं समजलं जात आहे.
Iran war  इराणमध्ये आता लोक आपल्या देशाचा झेंडा हातात घेऊन विज केंद्र आणि पुलांवर उभे आहेत. अनेक ठिकाणी लोक मानवी साखळी करून उभे आहे. यामध्ये नागरिक, तरुण, कलाकार आणि खेळाडूंचा देखील समावेश आहे, सुप्रीम कौन्सिल ऑफ यूथ अँड अडोलेसंट्सचे सचिव अलीरेझा रहिमी यांनी तरुणांना महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं रक्षण करण्यासाठी मानवी साखळी तयार करण्याचं आवाहन केलं आहे.
Iran war इराणमधील तरुणांना मानवी साखळी करण्याची कल्पना सुचली, त्यामुळे विद्यापीठातील तरुण, कलाकार आणि वेगवेगळ्या संघटनेची लोक आपल्या देशातील वीज केंद्रांभोवती मानवी साखळी करण्यासाठी पुढे आहे. या मोहिमेला ‘इराणच्या तरुणांची उज्ज्वल भविष्यासाठी मानवी साखळी‘ असं ठेवण्यात आलं आहे, असं रहिमी सांगितलं.