जुळ्या मुलींनी पार पाडले मातेचे अंत्यसंस्कार

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
आयुध निर्माणी, 
twin-daughters-perform-mothers-funeral : रूढी-परंपरांना छेद देत भद्रावतीतील झिंगुजी वॉर्ड येथील दोन जुळ्या बहिणी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावल्या. त्यांनी स्वतः मुखाग्नी दिला.
 
 
 
JK
 
 
पारंपरिक समजुतीनुसार, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. अंत्यसंस्कार विधीत मुलाकडूनच अंत्यसंस्कार सोपस्कार पार पाडण्याची अलिखित परंपरा समाजात रूढ आहे. मुलगा नसेल तर चुलत मुलाला पुढाकार घ्यायला लावून परंपरा जोपासल्या जाते. मात्र, या जुळ्या बहिणींनी मोठ्या धाडसाने व विरोधाला न जुमानता ही परंपरा मोडीत काढत, मातेप्रती आपले कर्तव्य पार पाडले.
 
 
हलाखीच्या परिस्थितीत जगणार्‍या मृत आईचे नाव अनिता चंदन नागपुरे असे असून, जुळ्या मुलींचे नाव निधी चंदन नागपुरे व विधी चंदन नागपुरे असे आहे. अंत्ययात्रेदरम्यान दोन्ही बहिणी तिरडीपुढे स्वतः चालत संपूर्ण दाहसंस्कार विधीमध्ये भाग घेतला. अंतिम समयी मातेच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या घटनेने उपस्थित नातेवाईक , जनसमुदाय भावनिक झाला होता. मातेचे अकाली निधन व वडील चंदन नागपुरे यांच्या हलाखीच्या पृष्ठभूमीवर या जुळ्या बहिणींनी दाखवलेले धैर्य अधिकच प्रेरणादायी ठरते.