तभा वृत्तसेवा
नेर,
ultimatum-to-unaided-schools : राज्यातील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित विद्यालयांना वारंवार मूल्यांकनाची संधी देऊनही अनुदान प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या निकषपूर्तता करण्यास अपात्र विद्यालयांना स्वयंअर्थसहाय्य विद्यालय म्हणून मान्यतेसाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ‘अल्टिमेटम’ दिला असून 30 एप्रिल हा अर्ज करण्याचा कालावधी निश्चित केला आहे.
या कालावधीत अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या विद्यालयांनी स्वयंअर्थसहाय्य मान्यतेसाठी अर्ज सादर केले नाहीत. तर अशा शाळांची मान्यता आपोआपच रद्द होणार असल्याचा शासन निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 1 व 2 एप्रिल रोजी निर्गमित केला आहे.
या विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे 1 ते 31 मे या कालावधीत नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळाव्यतिरिक्त प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विनाअनुदानित विद्यालयांसाठी दोन वेगवेगळे स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.
राज्यात विनाअनुदानित विद्यालय व वर्ग तुकड्यांवर कार्यरत शिक्षक तथा कर्मचाèयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अशा विनाअनुदानित विद्यालयांमध्ये व वर्ग तुकड्यांवर कार्यरत बहुतांश शिक्षक, कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून विनावेतन अथवा अत्यल्प वेतनावर नोकरी करीत आहेत. मान्यता रद्द होणाèया विनाअनुदानित विद्यालयातील शिक्षकांसमोर शासनाच्या या निर्णयाने त्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नेरपरसोपंत तालुक्यातील प्रताप शिक्षणसंस्था अजंतीद्वारा संचालित जयभारत विद्यालय, ब्राम्हणवाडा या विनाअनुदानित विद्यालयाचा अनुदानासाठी अपात्र विद्यालयाच्या यादीत समावेश आहे.