विदर्भातील पहिले इंटरव्यू क्लिनिक अमरावतीत

प्रो. राम मेघे कॉलेजच्या एमबीए विभागाचा उपक्रम

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
vidarbhas-first-interview-clinic : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचालित प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेरा येथे विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी एक अभिनव आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रम म्हणून इंटरव्यू क्लिनिकचे भव्य उद्घाटन आज उत्साहात झाले. विदर्भातील हा पहिलाच उपक्रम असून शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
 
 
J
 
 
 
संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी तसेच कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, डॉ. पूनम चौधरी, पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड, प्रा. गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. क्लिनिकचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अजय ठाकरे, एमबीए विभागप्रमुख डॉ. शशिकांत थोरात, प्रकल्प प्रमुख डॉ. लोभस घडेकर आणि प्रा. आतिफ सईद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
 
 
प्रस्ताविक प्रकल्प प्रमुख डॉ. लोभस घडेकर यांनी करून या उपक्रमामागील संकल्पना आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. विभागप्रमुख डॉ. शशिकांत थोरात यांनी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अजय ठाकरे यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला आणि करिअर संधींना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला व त्यांनी मुलाखती संदर्भातली उदाहरणे दिली. भविष्यात याला एआयची जोड देऊन अधिक प्रभावी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला
 
 
कार्यक्रमाचे संचालन संस्कृती ठाकरे आणि अर्पिता मोरशे यांनी केले तर शर्वरी सावळे हिने सरस्वती वंदन सादर केले. आभार प्रा. आतिफ सईद यांनी मानले.
 
विद्यार्थांना होणार फायदा
 
 
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून मुलाखत कौशल्ये, आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्ये अत्यंत महत्त्वाची ठरतात. याच पृष्ठभूमीवर सुरू करण्यात आलेले हे इंटरव्यू क्लिनिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीचा सराव, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. या क्लिनिकमध्ये विद्यार्थ्यांचे इन-कॅमेरा इंटरव्यू रेकॉर्डिंग करून त्यांच्या त्रुटींचे विश्लेषण करण्यात येत आहे. तसेच या प्रक्रियेचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येत असून इतर विद्यार्थ्यांनाही ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत आहे.