वाशीम जिल्हाधिकार्‍यांची थेट उद्योग पाहणी

गुणवत्ता, सुरक्षितता व रोजगारावर लक्ष

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
वाशीम, 
Washim District Collector's Industry Inspection जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नर्मदा सॉल्वेक्स प्रा. लि., काळुराम फूड प्रोडक्ट तसेच पतंजली फूड प्रोडक्ट या औद्योगिक युनिट्सना ७ एप्रिल रोजी भेट देऊन पाहणी केली. भेटीदरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित उद्योगांतील उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करत विविध टप्प्यांवरील कार्यपद्धतीची माहिती घेतली. कच्चा माल साठवण, प्रक्रिया, पॅकेजिंग व वितरण या सर्व बाबींमध्ये गुणवत्ता नियंत्रणासाठी अवलंबण्यात येणार्‍या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.
 
 
Washim District
 
 
यावेळी कामगारांसाठी उपलब्ध सुविधा, सुरक्षितता उपाययोजना तसेच कार्यस्थळी स्वच्छता राखण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. तसेच आयटीआय प्रशिक्षणार्थींना स्थानिक पातळीवर ऍप्रेन्टीसशिपच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयटीआय प्राचार्यांनी उद्योगांशी समन्वय साधून सक्रिय प्रयत्न करावेत, तसेच आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींना उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजाची ओळख होऊन त्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांना शिफ्टनिहाय औद्योगिक युनिट्समध्ये पाहणीसाठी आणावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले.