बीजिंग
fuel shortages China इराण-इस्रायल, अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जगावर इंधन संकटाचे काळे ढग असताना चीन मात्र बिनधास्त आहे. आपल्या गरजा भागविण्यासाठी चीनने आधीच योजनाबद्ध रितीने देश सांभाळला आहे.
fuel shortages China वास्तविक, चीनमध्ये वायू क्षेत्र कमी आहे. असे असूनही त्यांच्याकडे पुरेसा गॅस उपलब्ध आहे. याचे कारण म्हणजे चीनने कोळशाच्या वायूकरणामध्ये संयमाने भांडवल, कौशल्य आणि तंत्रज्ञान गुंतवले आहे. बèयाच काळापासून ही गोष्ट सातत्याने करून चीनने स्वत:ला स्वावलंबी बनवले आहे. भारताने चीनच्या आसपासच त्यावेळी या कल्पनेवर चर्चा सुरू केली आणि चीनच्या वार्षिक ८० दशलक्ष मेट्रिक टन उत्पादनाच्या तुलनेत भारताचे उत्पादन ३-५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. या ‘गॅसफिकेशन’साठी चीन वापरत असलेल्या ३४० एमएमटीपीए कोळशापैकी भारत सुमारे १.४ टक्के कोळसा वापरतो.
fuel shortages China २००७ मध्ये संपुआ सरकारने कोलबेड मिथेनबद्दल मोठ्या घोषणा केल्या आणि राणीगंज येथे एक छोटा प्रायोगिक प्रकल्प उभारला. तेव्हापासून ही कल्पना गोठलेल्या अवस्थेतच राहिली. तसेही संपुआच्या काळात कोळशाला वाईट नावलौकिक मिळाला.
fuel shortages China २०२० मध्ये मोदी सरकारने एक अत्यंत महत्वाकांक्षी राष्ट्रीय कोळसा वायूकरण अभियान सादर केले. या योजनेचे लक्ष्य २०३० पर्यंत १०० दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष कोळशाचे वायूकरण करण्याचे होते. त्यासाठी ४ ट्रिलियन रुपये म्हणजे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित होती. ही योजना पुढे जात होती. पण, भारताने कोळसा उत्खनन केवळ खुल्या खाणींपुरतेच मर्यादित ठेवले. परिणामी भारतातील सर्व भूमिगत कोळसा तसाच पडून आहे, तर दुसरीकडे चिनी लोक जमिनीखाली तीन किलोमीटरपर्यंत जात आहेत.